
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. माझा कोविड चाचणी अहवाल पाझिटिव्ह आला असून आपल्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. आपली प्रकृती उत्तम असून पुढील काही दिवस आपण विलगीकरणात राहणार आहोत. आयसीएमआरच्या नियमानुसार लवकरच आपण कोविड तपासणी करून 5 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित राहणार आहोत, असे त्यांनी कळवले आहे.


























































