निलंगा तालुक्यातील सीमावर्ती भागात वाळू आणि माती माफियांचा धुमाकूळ

1651

महाराष्ट्रामध्ये तसेच सीमावर्ती भागातील कर्नाटकमध्ये संचारबंदी आहे आणि शेती कामाच्या वाहतुकीशिवाय कुठल्याही वाहनांना गावात फिरण्यासाठी बंदी आहे. तसेच जेसीबी, पोकलेन यांच्यावर कामे बंद ठेवण्यासाठी सुचना आहेत. पेट्रोल पंप मालकांनाही फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहतूक करणाऱ्या, शासकीय व शेती काम करणाऱ्या वाहतूक कामासाठी पेट्रोल व डिजेल विक्री करण्यासाठी आदेश आहेत. गेल्या एक महिनाभरात पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन कोरोना साथरोग प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे यांच्यावर येत असलेल्या अतिरीक्त ताण येयेत आहे. त्याचा फायदा घेत वाळु माफिया आणि मातीमाफियांनी चक्क कर्नाटक राज्यातून जेसिबी, पोकलेन, टिप्पर मागवुन घेऊन दिवसरात्र औराद, सावरी, हालसी (तु.), होसुर हंगरगा (सि.) संपादीत जमीनीतुन माती उपसा करून विक्री जोमात केली केली आहे.

वाळू माफियांनी तर चक्क कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्याच्या सिमेवर असलेल्या मांजरा नदीपात्र व पंचाक्षरे यांच्या शेतीच्या बाजुस असलेल्या नदीपात्रात चक्क दिवसा जेसीबीच्या माध्यमातून माती उपसा करून नंतर वाळू उपसा करून ती वाळु महाराष्ट्र राज्यातील हुलसुर जाणारा जुना गाडीरस्ता तसेच कांही शेतकऱ्यांच्या शेतीत साठे केले आहे. या विषयी व्हिडीओ सोशल मिडीयात फिरल्यानंतर निलंगा तहसीलदार गणेश जाधव यांनी स्थळ पाहणी केली व ५०० ब्रास वाळुचे पंचनामे करून ती वाळू जप्त करण्याच्या सुचना दिल्या. मात्र जप्त केलेली वाळू ही ट्रॅक्टर मध्ये घेऊन जात असल्याचे अनेकांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या