
सामना ऑनलाईन | नगर
मुसळधार पावसामुळे नगर जिल्ह्यातील निळंवडे धरण ओव्हरफ़्लो झाले आहे. भंडारदरा धरणापाठोपाठ निळवंडे धरण भरल्याने जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न सुटला आहे. प्रशासनाने तांत्रिकदृष्ट्या तसे जाहीर केल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली आहे. धरण ओव्हरफ्लो झाल्याने धरणातून ७ हजार ५०० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. या हंगामात प्रवरा नदीला पूर येण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.





























































