पोलिसांनी दुचाकी उचलली, रागातून फेसबुक लाईव्हद्वारे शिवीगाळ; नऊ जणांवर गुन्हा दाखल

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहन उचलल्याचा राग आल्यानंतर फेसबुक लाईव्ह करून पोलिसांच्या कामवर प्रश्न चिन्ह उपस्थित करीत शिवीगाळ करणाऱ्यासह अश्लिल दर्जाच्या कंमेट करणार्‍या 9 जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय सागर (रा. अहिरिश गार्डन, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे), प्रशांत पाटील, परिक्षीत याल्लीर, विजय चौगुले, प्रज्वल सोनवणे, सचिन वाबळे, सतिष काळे, दत्तात्रय पटेरे, गणेश मोरे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत महिला पोलिसाने फिर्याद दिली आहे.

चालकाने वाहतूक नियम मोडल्याने 27 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या क्रेन गाडीने विजय सागर यांची दुचाकी उचलली. त्यावर सागरने मोबाईलमध्ये संबंधीत घटनेचे फेसबुक लाईव्ह केले. फेसबुक लाईव्हला इतर आठ जणांनी महिला पोलिसाविरोधात अश्लिल भाषेत कंमेंट लिहल्या. अत्यंत अश्लिल भाषेत आणि हीन दर्जाच्या कमेंट पाहिल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी महिलेनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कर्तव्य बजावणार्‍या पोलिस महिलेला अशा पध्दतीने टीका केल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी दिली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम गौड करत आहेत.