निर्भया प्रकरण; दोषी मुकेशची नवी खेळी. माजी वकिलाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींचे नवे डेथ वाॅरंट जारी करण्यात आलेले असून या चौघांना आता 20 मार्च रोजी फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. मात्र यातील एक दोषी मुकेश सिंह याने फाशी टाळण्यासाठी नवीनच खेळी खेळली आहे. त्याने आपल्या एक माजी वकील वृंदा ग्रोव्हार यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वृंदा ग्रोव्हर यांनी आपला विश्वासघात केला असे त्याचे म्हणणे आहे.

एका वृत्तवाहिणीने दिलेल्या वृत्तानुसार, निर्भया प्रकरणीतल दोषी मुकेश सिंह याचे वकीलपत्र आधी वृंदा ग्रोव्हर यांच्याकडे होते. मुकेश याने ग्रोव्हर यांच्याविरोधात दाखल केलेल्या आताच्या याचिकेनुसार, वृंदा ग्रोव्हर यांनी आपल्यावर दबाव टाकून क्युरेटिव्ह याचिका लवकर दाखल केली. ही याचिका दाखल करण्यासाठी त्याच्याकडे खूप वेळ शिल्लक होता. त्यामुळे त्याला क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका दाखल करण्याची संधी जुलै 2021 पर्यंत मिळायला हवी. वृंदा यांच्याविरोधात मुकेश याचा किश्कासघात करणे तसेच षडयंत्र रचणे या गुह्यासाठी खटला चालवला जावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका मुकेशचे सध्याचे वकील मनोहर लाल शर्मा यांनी दाखल केली आहे. या याचिकेकर 9 मार्च रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.