
दिल्लीतील ‘निर्भया’वर अमानुष अत्याचार करून तिला जीवे मारणाऱया आरोपींनी मृत्यूचा फास गळ्याभोवती घट्ट होणार याची चाहूल लागताच जीव वाचवण्यासाठी अखेरची धडपड सुरू केली आहे. या खटल्यात फाशी झालेल्या नराधम चौकडीतील पवन गुप्ता याने आता अपराध घडला तेव्हा मी अल्पवयीन (18 वर्षांखालील) होतो. मला फाशीऐवजी जन्मठेप द्या, अशी विनवणी करणारी क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.
विशेष म्हणजे दिल्ली ‘निर्भया’ खटल्यातील तीन दोषींच्या फाशीची तारीख अगदी जवळ आली आहे. कारण त्या तिघांकडे आता जीव वाचवण्याचा कुठलाही पर्याय उरलेला नाही . त्यामुळे त्यांना 3 मार्चला फासावर लटकावले जाणार हे निश्चित आहे. मात्र राष्ट्रपतींकडे दया याचिकाही न करणाऱया चौथ्या पवन गुप्ताने आता गुह्यासमयी मी अल्पवयीन होतो हो, असा टाहो फोडत सर्वोच्च न्यायालयाकडे जिवाची भीक मागितली आहे. पवनने न्यायालयात दाखल केलेल्या क्युरेटिव्ह याचिकेद्वारे मला फाशीऐवजी जन्मठेप द्या! असे साकडे न्यायालयाला घातले आहे. दोषी पवनचे वकील ए. पी. सिंह यांनी पवन गुह्याच्या वेळेस अल्पवयीन असल्याचे प्रतिपादन क्युरेटिव्ह याचिकेवरील सुनावणीत करणार आहेत.
आठ वर्षांनी दोषींच्या फाशीवर शिक्कामोर्तब
16 डिसेंबर 2012 च्या मध्यरात्री दिल्लीच्या वसंत विहार भागात पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करीत पाच जणांनी तिला मृत्यूच्या दारात लोटले होते. शिवाय तिच्यावर माणुसकीला काळिमा लावणारा हल्लाही केला होता. त्यानंतर सुमारे आठ वर्षांनी देशातील न्यायालयांनी या नराधमांच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले होते.




























































