दहीहंडी सराव शिबीर  

गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जागोजागी सराव शिबिराचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी वडाळा विधानसभा क्षेत्रातील युवासेना शाखा क्रमांक 201च्या वतीने भोईवाडा येथील ग.द. आंबेकर मार्गावरील श्री राम मंदिरासमोरील सन टॉवर बिल्डिंगमधील शाखेच्या प्रांगणात उद्या, शुक्रवारी सांयकाळी 7 ते 10 या वेळेत निष्ठेची दहीहंडी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विभागातील गोविंदा पथकांनी या सराव शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, असे आवाहन युवासेना शाखा अधिकारी व आयोजक रोहन काळे यांनी कळविले आहे.