
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचा इशारा निती आयोगाने दिला आहे. बहुतांश नागरिकांनी जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारने जारी केलेल्या कोविड प्रोटोकॉलचे पालन करणे बंद केले आहे.
यावर निती आयोगाने चिंता व्यक्त केली आहे. कोरोना विषाणू अजूनही आपल्यामध्ये आहे. या विषाणूच्या वाढत्या रुग्णसंख्येचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळेच आपल्याला नेहमी सतर्क राहण्याची गरज आहे, असे आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे. सध्याच्या परिस्थिती बूस्टर डोस अत्यंत गरजेचा आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) विमान प्रवासात मास्क बंधनकारक केला आहे.






























































