राहुल गांधींना मराठी कधीपासून कळायला लागलं?, गडकरींनी उडवली खिल्ली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जनतेने वचनांच काय झालं असं विचारलं की आम्ही हसून पुढे जातो, या विधानामुळे केंद्रीय नितीन गडकरी यांनापुन्हा एकदा आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला आहे, असं स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. मात्र हे स्पष्टीकरण करताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चिमटा काढायला ते विसरले नाहीत. राहुल गांधी यांना मराठी कधीपासून कळायला लागलं, असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.

नितीन गडकरी आज पत्रकारांसोबत बोलताना म्हणाले की, ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला असून दिल्लीतील एका वृत्तपत्रानं चुकीची बातमी छापली आहे. मी एका मराठी कार्यक्रमात बोलत होतो. यावेळी मी मोदी सरकार असा उल्लेख केलेला नाही. राहुल गांधी तर त्यावर बोलून मोकळे झाले. मात्र मला आश्चर्य वाटतं की राहुल गांधी यांना मराठी कधीपासून कळायला लागलं? माझी विनंती आहे की त्यांनी मराठी कुणाकडून तरी समजून घ्यावं. या आधी देखील त्यांनी असाच गोंधळ घातला होता.’