
मोदी सरकारच्या काळात गरिबी घटल्याचा दावा जरी केला जात आहे. मात्र याच सरकारमधील एक महत्त्वाचे मंत्री असलेले नितीन गडकरी यांनी देशातील गरिबीबात एक भाष्य करत स्वत:च्या सरकारला आरसा दाखवला आहे. ”देशात गरिबांच्या संख्येत वाढ होत आहे. तर संपत्ती ही काही मोजक्या श्रीमंत लोकांकडे एकवटली जात आहे’, असे नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात सांगितले आहे.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी ते म्हणाले की, देशातील संपत्ती काही लोकांच्या हातात एकवटत आहे. तिचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. देशात हळू हळू गरिबांची संख्या वाढत आहे. व श्रीमंत लोकांची श्रीमंती वाढत आहे. असे होऊ नये म्हणून अर्थव्यवस्था अशा प्रकारे वाढली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचा विकास होईल, असे गडकरी म्हणाले.