माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, माफी मागणार नाही – वारीस पठाण

4240
waris-pathan

भाजप लोकांमध्ये फूट पाडत आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे वक्तव्य एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी केले. तसेच या प्रकरणी माफी मागणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले.

15 फेब्रुवारी रोजी कर्नाटकात झालेल्या सभेत पठाण म्हणाले होते की ‘हमारे 15 करोड शेरनीय 100 करोडपर भारी पडेगी.’ त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद झाला. आज त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “या देशात कुठल्याही धर्माविरोधात बोलणारा मी शेवटचा माणूस असेल. आपल्या देशात 130 कोटी लोक राहतात. त्यांच्यात भाजप फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असून माध्यमांनी हे प्रकरण वादग्रस्त केले आहे. त्यांनाच वाद हवा होता.” मी हिंदू हा शब्द वापरलाच नाही, म्हणून माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असे पठाण म्हणाले.

‘हमारी 15 करोड शेरनीया 100 पे भारी,’ एमआयएम नेते वारीस पठाण यांचे वादग्रस्त वक्तव्य

आपली प्रतिक्रिया द्या