
सामना ऑनलाईन । वॉशिग्टंन
मुंबई हल्ल्यातील गुन्हेगार डेविड हेडली वर अमेरिकेत जीवघेणा हल्ला झाला झाला होता. पण हेडलीच्या वकिलाने या बातमीत तथ्य नसल्याचे सांगितले आहे. तसेच हेडली हा ना इस्पितळात आहे ना शिकागोत आहे, असे त्याच्या वकिलाने सांगितले.
८ जुलै रोजी हेडलीवर तुरुंगात हल्ला झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या हल्ल्यात हेडली गंभीर जखमी झाला असून त्याला नॉर्थ अवेस्टन इस्पितळात दाखल करण्यात आले होते. हेडलीच्या वकिलांनी या बातमीचे खंडन केले व म्हणाले की ‘हेडली आणि मी संपर्कात आहोत, भारतीय माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांत काही तथ्य नाही.”
२६/११ चा गुन्हेगार हेडलीवर अमेरिकेच्या जेलमध्ये हल्ला, प्रकृती गंभीर




























































