राज्यात दारूबंदी नाहीच; बावनकुळे यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
liquor Liqueur

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक दारू दुकाने, हॉटेल बंद झाली आहेत. असे असले तरी भविष्यात राज्यात दारूबंदी होणार नसल्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

सर्वसामान्यांना दारूच्या व्यसनातून मुक्त करायचे असल्यास त्यासाठी व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबविण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनेक शहरांतून जाणाऱ्या महामार्गांवरील दारू दुकाने आणि हॉटेल बंद झाली आहेत. त्यामुळे परिस्थिती बिकट झाली असून, नियमानुसार असलेल्या दुकान आणि हॉटेलसमोर दारू मिळविण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आवर्जून सांगितले.