बेस्ट बसगाड्यांमध्ये सीसीटीव्हीच नाहीत

36

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील बहुतांश बेस्ट बसगाड्यांमधील सीसीटीव्ही कंत्राटदाराने काढून घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. कंत्राटामधील तरतुदीनुसार संबंधित कंपनीने बसगाड्यांमधील सीसीटीव्ही कॅमेरे काढून घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता बसगाड्यांमध्ये सीसीटीव्हीच नसल्यामुळे मुंबईतील बसगाड्यांमध्ये चोरटय़ांचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे.

मुंबईतील बहुतांश बेस्ट बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही नसल्याबाबतचा प्रश्न काँग्रेसच्या विजय गिरकर आणि भाजपचे प्रवीण दरेकर यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तर दिले. बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे तसेच त्यांची देखभाल करणे याचा संपूर्ण खर्च कंत्राटदाराने केला असून बेस्ट उपक्रमातर्फे कोणताही खर्च करण्यात आला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या