राज्यातल्या 14 जिल्ह्यांत कोरोना रुग्ण संख्या शून्यावर; 31 जिल्ह्यांत एकही मृत्यू नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्य कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिलासादायक चित्र आज पाहायला मिळाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद आज झाली आहे. राज्यातल्या चौदा जिल्हय़ांमध्ये दिवसभरात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

आज राज्यात फक्त 889 रुग्णांची नोंद झाली. मार्च 2020मध्ये कोरोनाची पहिली लाट आल्यापासून आज नोंदवण्यात आलेली ही सर्वात कमी रुग्ण संख्या आहे. राज्यात दिवसभरात बारा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला.

  • 12 जिह्यांमध्ये केवळ एकाच रुग्णाची नोंद
  • मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी वगळता इतर जिह्यांत एकही मृत्यू नाही.
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  97.47 टक्के, मृत्युदर 2.12