पिंपरी-चिंचवड दहा दिवसांमध्ये कोरोनाचा एकही ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण नाही; 1425 जण ‘होम क्वारंटाईन’

1532

पिंपरी-चिंचवड शहरात मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा एकही नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. त्याउलट मागील तीन दिवसात दिवसात 12 पैकी आठ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता केवळ चार रुग्ण कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी एका रुग्णाचे पहिले रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. तर, परदेशातून शहरात आलेले 1425 जण ‘होम क्वारंटाईन’मध्ये आहेत. 5 लाख 34 हजार 567 नारिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाबाधित शेवटचा रुग्ण शुक्रवारी (दि.20) रोजी आढळला होता. त्यानंतर एकही नवीन रुग्ण आढळला नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकुण 222 व्यक्तींचे कोरोना तपासणीसाठी घशातील द्रावाचे नमुने एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी आज अखेर 191 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तसेच आज (रविवारी) 21 संशयितांना नविन भोसरी रुग्णालय व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपाणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

पॉझिटिव्ह 9 रुग्णांपैकी नवीन भोसरी रुग्णालयातील ज्या रुग्णांचा 14 दिवसाचा कालावधी पुर्ण झाले आहे. अशा 5 रुग्णांचे 24 तासातील घशातील द्रावाचे लागोपाठ दोन नमुन्याचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यांना घरामध्ये 14 दिवस अलगीकरणामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे एकुण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 4 आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आयसोलेशन कक्षामध्ये उपचार सुरु आहेत.
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे घरात विलगीकरणात असणाऱ्या नागरिकांची संख्या 1425 आहे. त्या सर्वांनी किमान 14 दिवसासाठी व आवश्यकता भासल्यास पुढील 28 दिवसांपर्यत घरातच थांबण्याच्या सूचनांचे पालन करावे. महापालिकेने शहरातील 5 लाख 34 हजार 567 नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या