
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय आता मेडिकलमधून कफ सिरप मिळणार नाही. पेंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भातील नियमात महत्त्वाचे बदल केले असून तशी अधिसूचना काढली आहे.
प्रीस्क्रिप्शनशिवाय खरेदी करता येणाऱया औषधांचा समावेश ‘ड्रग्ज रुल्स 1945’ मधील परिशिष्ट क मध्ये करण्यात आला होता. त्यात कफ सिरफचाही समावेश होता. आता हे औषध ‘शेडय़ुल के’मधून वगळण्यात आले आहे. याचाच अर्थ आता ते डॉक्टरांनी लिहून दिल्याशिवाय कोणत्याही केमिस्टकडे मिळणार नाही.
मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे काही दिवसांपूर्वी दूषित कफ सिरफ प्यायल्याने 22 मुलांचा मृत्यू झाला होता. राजस्थानमध्येदेखील अशाच घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पेंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
जनतेच्या सूचनांनुसार बदल
नियमातील दुरुस्तीचा मसुदा 30 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर लोकांच्या हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या सूचनांचा आढावा घेऊन नियमातील बदलावर शिक्कामोर्तब करण्यात आले.



























































