अखेर ‘Cow Hug Day’ वरून पशू कल्याण मंडळाची माघार, आदेश मागे घेतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
cow-hug-day

देशाच्या पशू कल्याण मंडळाने 14 फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून ओळखला जाणारा दिवस गायीला आलिंगन देण्याचा दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्दश दिले होते. त्यानंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स झळकले. अखेर पशू कल्याण मंडळानं हे आदेश मागे घेतल्याचा निर्णय जाहीर केला.

‘Cow Hug Day’ वरून तुफान मीम्स आणि जोक्सही सुरू होते. विरोधकांनी देखील यावरून मोदी सरकारला चांगलंच लक्ष्य केलं होतं. अखेर ते आदेश मागे घेण्यात आले.