
पश्चिम रेल्वे मार्गावर देखरेख आणि दुरुस्तीच्या कामसाठी शनिवारी मध्यरात्रीपासून रविवारी सकाळी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार नसल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली आहे. रविवारी ब्लॉक घेण्यात येणार नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
शनिवारी मध्यरात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉकच्या काळात माहिम ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान जलद मार्ग आणि 5 व्या मार्गिकेच्या देखरेख आणि दुरुस्तीच्या कामासाठी 4 तासांच्या जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसभरात पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही. जम्बो ब्लॉकच्या जलद मार्गावरील सर्व गाड्या सांताक्रूज ते मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.


























































