चर्चा निष्फळ, शेट्टी आंदोलनावर ठाम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | मुंबई

दुधाला पाच रुपये अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी खासदार राजू शेट्टी आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात जवळपास अडीच तास चाललेली बैठक निष्फळ ठरली आहे. बैठकीनंतर राजू शेट्टींचा निरोप घेऊन गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत, राजू शेट्टी यांच्या मागण्या समजून घेतल्या आहेत, एक दोन दिवसात हे आंदोलन संपवू, असं महाजन यांनी सांगितलं आहे.मात्र आंदोलन थांबवणार नाही, असं सांगत आज होणाऱ्या चक्का जाम आंदोलनावर राजू शेट्टी ठाम आहेत.

आमच्या मागण्या पुर्ण करणार असतील तर आम्हाला बैठकीला बोलावलं नाही तरी चालेल. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही,  असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.