
सामना ऑनलाईन, मुंबई
वांद्रय़ातील एमटीएनएलच्या कार्यालयाला सोमवारी लागेलेल्या भीषण आगीत अग्निशमन दलात नुकत्याच दाखल झालेल्या ‘समर’ रोबोची मोठी मदत झाली. मात्र ‘एमटीएनएल’ची अग्निशमन यंत्रणा ठप्प असल्यामुळे आग विझवण्यासाठी पाण्याचा हायप्रेशर असणारे तब्बल आठ पाइप जिन्यातून सोडावे लागले होते. या प्रत्येक पाइपमधून प्रत्येक मिनिटाला बाहेर पडणारे तब्बल दोन हजार लिटर पाणी आगीवर पडून जोरदार प्रवाहाने खाली येत असल्यामुळे रोबो जिन्यातून चढवण्यात काही अडचणी आल्याचेही स्थायी समितीत स्पष्ट करण्यात आले. रोबोत कुठल्याही त्रुटी नसल्याचेही अग्निशमन दलाकडून यावेळी सांगण्यात आले.


























































