आता तुम्हीच ठरवा, तुमचा डीपी कोणाला दिसणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपला व्हॉट्सऍप डीपी कोणाला दिसणार आणि कोणाला नाही, हे आता युजर्स ठरवू शकणार आहेत. तसे नवे फीचर युसर्जला उपलब्ध होणार आहे.  व्हॉट्सऍप ऍण्ड्राईड बीटा युजर्ससाठी हे फीचर जारी करण्यात आले आहे. त्यामुळे निवडक लोकांकरिता युजर्सला आपला फोटो, लास्ट सीन आणि अबाऊट सेक्शनला हाईड करता येईल. त्यासाठी युसर्जला ऍण्ड्राईडचे लेटेस्ट बीटा व्हर्जन अपग्रेड करावे लागेल.

नवीन फीचरसाठी प्रायव्हसी सेटिंगमध्ये जाऊन युजर्सला ‘माय कॉन्टॅक्टस् एक्सेप्ट’ हे ऑप्शन निवडावे लागेल. नवीन ऑप्शन युजर्स निवडतील, त्या वेळी तुम्ही सिलेक्ट केलेले कॉन्टॅक्ट नंबर तुमचे प्रोफाईल फोटो, लास्ट सीन आणि अबाऊट इंफो बघू शकणार नाहीत. सध्या व्हॉट्सऍपवर लास्ट सीन लपवण्याचे किंवा फक्त कॉन्टॅक्टला शो करण्याचा ऑप्शन मिळत आहे. जर नवे फीचर हवे असेल तर युजर्सला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागेल.