आणीबाणीत कारावास  भोगलेल्यांचे मानधन बंद, आर्थिक उपाययोजनांसाठी योजना बंद

469

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने अनेक आर्थिक उपाययोजना योजल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेल्यांना मानधन देण्याची योजना बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

आणीबाणीच्या काळात लोकशाहीसाठी लढा देताना कारावास  भोगलेल्यांना मानधन देण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला होता. पण या निर्णयावर तेव्हा काँग्रेस सरकारने कडाडून टीका केली होती.

मानधन किती व कोणाला

आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास  भोगलेल्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला पाच हजार रुपये तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास  भोगलेल्या व्यक्तींना दरमहा पाच हजार रुपये व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला  अडीच हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय तत्कालीन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतला होता. आणीबाणीच्या काळात कारावास  भोगलेल्या सुमारे 3 हजारांहून अधिक जणांना मानधन देण्यात येत होते.

का बंद केले मानधन

कोविड 19च्या प्रादुर्भावामुळे 2020-21 या वित्तिय वर्षात राज्याचा कर व उत्पन्नात महसुली घट होण्याचा चिन्हे आहेत. त्याचा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मानधन बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने  याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या