केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या दहावी- बारावीच्या परीक्षा पद्धतीत बदल केला आहे. यंदा कोरोनामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा दोन सत्रांत घेण्यात आल्या होत्या. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावी-बारावीसाठी सत्र परीक्षा पद्धती लागू नसणार, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे. वर्ष 2022-23 पासून बोर्डाच्या परीक्षा वर्षाच्या शेवटी एकदाच घेतल्या जाणार आहेत.
सीबीएसई बोर्ड पूर्वीप्रमाणे एक परीक्षा पद्धती पुन्हा आणण्याचा विचार करीत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वर्षीच्या परीक्षा दोन सत्रांत घेतल्या जात आहेत. डिसेंबरमध्ये पहिली सत्र परीक्षा घेण्यात आली आता 26 एप्रिलपासून दुसरी सत्र परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

































































