राहाता पालिकेचा अजब कारभार: गेल्या वर्षभरात विशेष सभेचे प्रोसीडींगच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पोळा सणासाठी राहाता शहराची बाजारपेठ अशी सजली पण दुष्कळाच्या सावटाने बाजारात ग्राहकच नाही (छाया : अशोक सदाफळ)

सामना प्रतिनिधी । राहाता

राहाता नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभांचे प्रोसींडींग एक वर्षापासून लिहलेच गेले नसल्याचा आरोप उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे व विरोधी नगरसेवकांनी केल्यामुळे पालिकेची शासन दरबारी अनेक कामे रखडली जात आहेत. याला नगराध्यक्षाच जबाबदार असल्याचा आरोप या नगरसेवकांनी करून जर सदस्यांनी सभागृहात मांडलेली कामे व ठराव लिहायचीच नसतील तर सर्वसाधारण सभा घेताच कशाला असा सवाल माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक साहेबराव निधाने यांनी केला आहे.

राहाता नगरपालिकेत होणाऱ्या सर्वसाधारण सभेचे प्रोसीडींग गेल्या एक वर्षापासून लिहलेच नसल्याचे समोर आले आहे. तसेच मिटींगच्या व प्रोसीडींगची माहीती सदस्यांनी वारंवार मागूनही त्यांना त्याच्या नकला दिल्या जात नाही. सभेच्या मिनीट बुकमध्ये सभेच्या वेळी सदस्यांचे म्हणणे किंवा विरोध लिहीला जात नाही व सदर बुक सभागृहाला दाखविले जात नसल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे करूनही ती दिली जात नाही. सदर मिनिट बुक व प्रोसीडींग हे नगराध्यक्षा यांच्या ताब्यात असल्याने तुम्हाला माहीती देऊ शकत नाही असे मुख्याधिकारी यांच्याकडून सदस्यांना तोंडी सांगीतले जाते.

वास्तविक १ जानेवारी २०१८ पासून हे प्रोसींडीगच लिहले गेले नसल्याचे नुकतेच उघड झाले आहे. सदर प्रोसडींग बुक लिहणारा क्लॉर्क नकला मागूनही तो देत नसल्याने त्याचा चार्ज नुकताच मुख्याधिकारी यांनी काढून घेऊन दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे दिल्यानंतर गेल्या एक वर्षापासून प्रोसीडींग बुक अपूर्ण असल्याचे समोर आले आहे. पदभार घेताना अपूर्ण काम पूर्ण करून द्यावे, असे पत्र मागील क्लार्कला देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षापासून शहरातील विकास कामे ठप्प असून त्याला जबाबदार कोण? केवळ भुमिगत गटार हेच एकमेव विकास काम आहे का, जनतेच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे सभागृहाने मंजूर केलेली असताना ती का केली जात नाही, असा सवाल उपनगराध्यक्ष पठारे यांनी केला.