मंगळवारी जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ,खार, अंधेरीत पाणी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महापालिकेच्या एच-पश्चिम, के-पूर्व व के-पश्चिम विभागात येणाऱया जलवाहिन्यांच्या झडपा बदलण्याचे काम मंगळवार, 13 जुलैला करण्यात येणार असल्यामुळे जुहू, विलेपार्ले, सांताक्रुझ, खार, अंधेरीत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, तर काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना पुरेसा पाणीसाठा करून पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

कोरोनाचे संकट रोखण्याचे काम यशस्वीपणे करत असतानाही मुंबई महापालिका नागरी सेवा-सुविधाही सुरळीतपणे देत आहे. मुंबईकरांना पिण्याचे स्वच्छ व शुद्ध पाणी मिळावे यासाठीदेखील महापालिका अव्याहतपणे कार्यरत आहे. मुंबईकरांना करण्यात येणारा दैनंदिन पाणीपुरवठा हा सुरळीतपणे व्हावा यासाठी महापालिकेद्वारे पाणीपुरवठाविषयक परिरक्षणाची विविध कामे वेळोवेळी आवश्यकतेनुसार हाती घेतली जातात. याच कामांचा भाग म्हणून पश्चिम उपनगरातील एच-पश्चिम, के-पूर्व व के-पश्चिम विभागातील जलवाहिन्यांच्या झडपा बदलण्यात येणार आहेत.

के–पश्चिम विभाग

  • गिल्बर्ट हिल – कमी दाबाने पाणीपुरवठा
  • जुहू-कोळीवाडा (उर्वरित पुरवठा) – कमी दाबाने पाणीपुरवठा
  • चार बंगला – कमी दाबाने पाणीपुरवठा
  • विलेपार्ले (पश्चिम), जे. व्ही. पी. डी., नेहरूनगर – पाणीपुरवठा बंद राहील.

एच–पश्चिम विभाग

  • खोतवाडी, गझदरबंध, एस. व्ही. मार्ग (खार), लिंपिंग रोड (खार), सांताक्रुझ (पश्चिम), खार (पश्चिम) – कमी दाबाने पाणीपुरवठा

के–पूर्व विभाग

  • विलेपार्ले (पूर्व) (संपूर्ण विलेपार्ले पूर्व डोमेस्टिक एअरपोर्ट) – कमी दाबाने पाणीपुरवठा
  • सहार मार्ग, ना. सी. फडके मार्ग, ए. के. मार्ग, गुंदवली गावठाण, तेली गल्ली, साईवाडी, जिवा महाले मार्ग – कमी दाबाने पाणीपुरवठा
  • मोगरपाडा, नवीन नागरदास मार्ग, जुना नागरदास मार्ग – कमी दाबाने पाणीपुरवठा

एच–पश्चिम, के–पश्चिम, के–पूर्व विभाग

  • 13 जुलै 2021 रोजी रात्री 10 वाजेपासून सकाळी 10 वाजेपर्यंत काही ठिकाणी कमी दाबाने, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.