
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका तरुणाने लिफ्ट नाकारल्याचं दिसत आहे. पण ही लिफ्ट नाकारल्याचं कारण ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.
चित्रपटकार विनोद कापडी यांनी आपल्या ट्विटरवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. नोएडा येथील हा व्हिडीओ असून यात एक तरुण पाठीला बॅग लावून रात्रीच्या वेळी रस्त्याने धावत आहे. जवळपास रात्रीच्या बारा वाजता त्याला धावताना पाहून कापडी यांनी त्याला लिफ्ट देऊ केली.
पण, त्या 19 वर्षांच्या तरुणाने ती लिफ्ट नाकारली आणि तो धावत घरापर्यंत जाणार असल्याचं सांगितलं. त्यावर कापडी यांनी त्याला त्याच्या कामाचे तपशील विचारले. तेव्हा तो म्हणाला की, तो नोएडा येथील सेक्टर 16मध्ये असणाऱ्या एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये काम करतो. त्यावर कापडी यांनी त्याला मध्यरात्री अशा प्रकारे धावण्याचं कारण विचारलं तेव्हा त्याने दिलेल्या उत्तराने सर्वांची मन जिंकली.
तो म्हणाला की, मला सैन्यात भरती व्हायचं आहे. माझ्या कामाचं स्वरूप पाहता मला त्यासाठी शारीरिक प्रशिक्षणाचा वेळ मिळत नाही. त्यामुळे माझं काम संपलं की मी अशाच प्रकारे धावत घरी जातो. त्यामुळे माझा धावण्याचा सराव होतो, असं त्याने म्हटलं आहे. त्याच्या या उत्तरामुळे कापडींसह नेटकरीही त्याचं कौतुक करत आहेत.
या तरुणाचं नाव प्रदीप मेहरा असून तो मूळचा उत्तराखंड येथील अल्मोडाचा रहिवासी आहे. त्याच्या आईवर उपचार सुरू असून ती रुग्णालयात दाखल आहे. तो त्याच्या भावासोबत नोएडा येथे राहतो आणि रोज अशाच प्रकारे 10 किमी चालतो. हा व्हिडीओ संपताना कापडी यांनी त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीला पडत आहे.
पाहा व्हिडीओ –
This is PURE GOLD❤️❤️
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिएबार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️😊 pic.twitter.com/kjBcLS5CQu
— Vinod Kapri (@vinodkapri) March 20, 2022
























































