Nokia ने लॉन्च केले दोन सर्वात स्वस्त मोबाईल, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

HMD Global ने गुरुवारी नोकिया ब्रँडचे 6 नवीन फोन Nokia C10, Nokia C20, Nokia G10, Nokia G20, Nokia X10 आणि Nokia X20 लॉन्च केले आहे. एका ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे हे फोन लॉन्च करण्यात आले आहेत. यातील Nokia C10 आणि Nokia C20 हे फोन अँड्रॉईन 11 (गो एडिशन)सह लॉन्च करण्यात आले असून हे कंपनीचे सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहेत. या दोन्ही फोनबाबत अधिक जाणून घेऊया…

Nokia C10 स्मार्टफोनची वैशिष्ट्य

– 6.51 इंचाचा एचडी+ (720×1600 पिक्सल) डिस्प्ले
– क्वाड-कोर Unisoc SC7331e प्रोसेसर
– 1 आणि 2 जीबी रॅम व 16 आणि 32 जीबी स्टोरेजचा पर्याय (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढ करता येणार)
– 3000mAh ची बॅटरी
– अपर्चर एफ/2.2 लेन्ससोबत मेगापिक्सलचा कॅमेरा
– सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा

nokia-c10

Nokia C10 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, ए-जीपीएस, एफएम रेडियो, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आले आहे. स्मार्टफोनचे वजन 191 ग्रॅम आहे.

Nokia C20 ची वैशिष्ट्य

– ड्यूल सीम
– 6.51 इंचाचा एचडी+ (720×1600 पिक्सल) डिस्प्ले
– 2D Panda ग्लास प्रोटेक्शन
– ऑक्टा-कोर Unicoc SC9863a प्रोसेसर
– 1 आणि 2 जीबी रॅम व 16 आणि 32 जीबी स्टोरेजचा पर्याय (मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256 जीबीपर्यंत वाढ करता येणार)
– 3000mAh ची बॅटरी
– 5 मेगापिक्सलचा रिअर आणि 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा (एलईडी फ्लॅशसह)

nokia-c20

Nokia C20 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4जी एलटीई, वायफाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.2, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो, माइक्रो-यूएसबी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅकसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. स्मार्टफोनचे वजन 191 ग्रॅम आहे.

किंमत –

Nokia C10 च्या 1 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएन्टची किंमत 79 युरो (7000 रुपये) आहे. 1 जीबी रॅम आमि 32 जीबी स्टोरेज व 2 जीबी रॅम आमि 16 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत अजून सांगण्यात आलेली नाही.

Nokia C20 च्या 1 जीबी रॅम व्हेरिएन्टची किंमत 89 युरो (7900 रुपये) आहे.

दोन्ही फोनची विक्री जून महिन्यापासून सुरू होणार असून Nokia C10 हा फोन ग्रे आणि लाईट पर्पल तर Nokia C20 फोन डार्क ब्लू आणि सँड कलरमध्ये उपलब्ध असणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या