
सामना प्रतिनिधी । कुडाळ
शिवसेनेच्या वतीने पिंगुळी जिल्हा परिषद विभागात शाळेतील मुलांना मंगळवारी वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना जिल्हा परिषद सदस्य संजय पडते यांच्या हस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी पिंगुळी सरपंच सौ.निर्मला पालकर, माजी सरपंच मिलिंद परब, ग्रामपंचायत सदस्य राजन सडवेलकर, भरत परब, सौ. खुजरेकर, पिंगुळी शिवसेना विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, सुशील चिंदरकर, अण्णा काराणे, राजन सडवेलकर, आदेश धुरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान केंद्र शाळा नं.१, आसनाचे पाणी, गोंदियाळे, सराफदार वाडी, टेंबधुरी नगर, आंबेडकर नगर व गुढीपुर शेकटकरवाडी या शाळांमध्ये वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.































































