
आर्थर अॅश स्टेडियमवरील झगमगत्या प्रकाशझोतात खेळल्या गेलेल्या सामन्यात दिग्गज नोव्हाक जोकोव्हिचने पुन्हा एकदा आपल्या अप्रतिम फोरहॅण्ड आणि बॅकहॅण्डचे दर्शन घडवले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात जोकोव्हिचने विजय मिळवला.
जोकोविचने लागोपाठ दोन सेट जिंकले होते, पण तिसऱया सेटमध्ये तो मागे पडला. चौथ्या सेटमध्ये चोको व्हिचने आपला संघर्षपूर्ण खेळ कायम राखत शेवटच्या निर्णायक क्षणी जोकोव्हिचने अविश्वसनीय खेळ केला आणि 6-3, 7-5, 3-6, 6-4 अशा विजयासह उपांत्य फेरी गाठली. आता 25 व्या ग्रॅण्डस्लॅम जेतेपदाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी कार्लोस अल्कराझशी झुंजावे लागणार आहे.