जोकोविच चौथ्यांदा विम्बल्डन विजेता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । लंडन

सर्बियाच्या नोवाक जोकोविच याने रविवारी टेनिस कोर्टवर जबरदस्त कामगिरी करीत दक्षिण आफ्रिकेच्या केव्हीन ऍण्डरसनला ६-२, ६-२, ७-६ अशा फरकाने पराभूत करीत चौथ्यांदा विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याचा मान संपादन केला. हे त्याचे १३वे ग्रॅण्डस्लॅम जेतेपद ठरले. तसेच २०१६ सालामध्ये फ्रेंच ओपन जिंकल्यानंतर त्याने तब्बल दोन वर्षांनंतर ग्रॅण्डस्लॅम जिंकले हे विशेष. केव्हीन ऍण्डरसनच्या रूपात तब्बल ९७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने विम्बल्डनच्या फायनलपर्यंत मजल मारली होती.

नोवाक जोकोविच व केव्हीन ऍण्डरसन या दोघांनाही उपांत्य फेरीच्या लढतीत कडवा संघर्ष करावा लागला होता. दोघांच्याही फिटनेसचा यावेळी कस लागला होता. नोवाक जोकोविचने पहिले दोन्ही सेट प्रत्येकी ६-२ अशा फरकाने जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये केव्हीन ऍण्डरसनने त्याला कडवी झुंज दिली. पण टायब्रेकरमध्ये नोवाक जोकोविचने ७-६ अशी बाजी मारली.