कोरोनाची सर्वसमावेशक माहिती देणारे नोवेल कोरोना पुस्तक प्रदर्शित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या पाच-सहा महिन्यांपासून जगभर थैमान घालणारा आणि संपूर्ण भारतात शिरकाव झालेला तसेच जिल्ह्यात ही हात-पाय पसरु पाहणा-या कोवीड-19 (कोरोना) ला रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे.शासनाकडुन यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असुन, जनतेने योग्य ती खबरदारी घ्यावी. असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

डॉ.संदीप जे.पाटील व पत्रकार भारतभूषण गिरी यांनी लिहिलेल्या ‘नोवेल कोरोना’ या पुस्तकाच्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या प्रकाशन  प्रसंगी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रथमच अशाप्रकारे पुस्तक तयार करण्यात आले असुन, यामध्ये कोरोनाची ओळख, लक्षणे, आतापर्यंतच्या साथीच्या रोगांचा आढावा, अन्य राष्ट्रातील कोरोनाची स्थिती,याचा पर्यावरणावर झालेला परिणाम, पुर्नरचनेची संधी, साथ वाढण्याचे टप्पे, घ्यायची काळजी, आहार अशी सर्वसमावेशक माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध योगतज्ञ डॉ.संप्रसाद विनोद यांनी प्रस्तावना लिहिली आहे.

यावेळी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, जि.परिषदेचे मुख्य कार्य.अधिकारी अमन मित्तल, कुमार पाटील, कोल्हापूर मेडिकल असो.चे अध्यक्ष डॉ.आबाजी शिर्के आदी उपस्थित होते