‘हॅप्‍पी मील’मध्‍ये आता बर्गर-कॉर्नसह मिळणार मुलांसाठी मनोरंजक पुस्‍तकं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
happy-meal

मॅकडोनाल्‍ड्स इंडियाने हॅप्‍पी मील रीडर्स प्रोग्रामच्‍या लाँचची घोषणा केली आहे. या उपक्रमाचा भाग म्‍हणून मॅकडोनाल्‍ड्सकडून मुलांना हॅप्‍पी मीलमध्‍ये पुस्‍तके मिळतील. मुलांमध्‍ये जिज्ञासा निर्माण करण्‍याचा आणि वाचनाची गोडी निर्माण करत त्‍यांना वाचनाची सवय लावण्‍याचा विचार ही पुस्तके देण्यामागे आहे. नवीन हप्‍पी मीलमध्‍ये आता आवडीचा बर्गर, पेय, कपभर गरमागरम व वाफवलेले कॉर्न आणि पुस्‍तकाचा समावेश असेल.

यासाठी 12 वेगवेगळी पुस्‍तकं लिहिली गेली आहेत. संग्रहाला ‘टायनी डिटेक्टिव्‍ह्ज’ असे नाव देण्‍यात आले आहे, जे मुलांना झाडे, कोळी, तारे, कोअला अस्‍वल आणि इतर अनेक गोष्‍टींबाबतच्‍या कल्‍पनात्‍मक कथा जाणून घेण्‍याची संधी देईल. ही पुस्‍तके विशेषत: 6 वर्षे व त्‍यावरील वयोगटातील मुलांच्‍या जिज्ञासू विचारसरणीसाठी लिहिण्‍यात आली आहेत, ज्‍यामध्‍ये ते अनेकदा त्‍यांच्‍या पालकांना विचारणाऱ्या प्रश्‍नांची उत्तरे देण्‍यात आली आहेत. ग्राहकांना पश्चिम व दक्षिण हिंदुस्थानातील मॅकडोनाल्‍ड्स स्‍टोअर्समध्‍ये हॅप्‍पी मील खरेदी केल्‍यानंतर दोन पुस्‍तकांमधून निवड करण्‍याची सुविधा देण्‍यात येईल.