रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर कॅप्टनचा वॉच

25

सामना प्रतिनिधी। रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यांवर आता कॅप्टनचाही वॉच असणार आहे. गोव्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवरही सुरक्षा यंत्रणा राबवण्याचा संकल्प जिल्हा प्रशासनाने केला आहे. याअंतर्गत मोठ्या समुद्रकिनाऱ्यांवर ४ जीवरक्षकांबरोबर एका कॅप्टनची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी प्रदीप पिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली़ आहे.

जिल्ह्यातील समुद्रकिंनाऱ्यांवर पर्यटक बुडण्याच्या घटना वाढत आहेत. याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यातील ३२ ठिकाणी जीवरक्षकं नेमण्यात येणार आहेत़. आरेवारे येथे ५ जीवरक्षक नेमण्यात येतील. गणपतीपुळे, गुहागरसारखे मोठ्या समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांची संख्या वाढवण्यात येणार असून येथे कॅप्टनही नेमण्यात येणार आहे.

तसेच समुद्रकिनाऱ्यांच्या देखरेखीसाठी एक पर्यवेक्षकं आणि जिल्हास्तरावर एक जिल्हा व्यवस्थापक असावा अशा पध्दतीची एक रचना आम्ही मंजूरीसाठी प्रशासनाकडे पाठवली आहे़. त्याचप्रमाणे काही समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षेसाठी साधनसामुग्री आणि जेट स्की उपलब्ध करुन देण्यावर आमचा भर असेल असे जिल्हाधिकारी प्रदीप पिय़ांनी यावेळी सांगितले़.

आपली प्रतिक्रिया द्या