मुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या शाळा दर महिन्याच्या दोन शनिवारी दप्तराविना चालणार आहेत. त्या शनिवारी विद्यार्थ्यांना दप्तर न घेता शाळेत जाता येईल. त्या दोन शनिवारी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे उपक्रम शाळेत राबवले जातील. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी ‘नो स्कूल बॅग डे’ म्हणजेच दप्तराविना शाळा हा उपक्रम सुरू करण्याची सूचना शिक्षण समितीमध्ये मांडली. त्यावर पालिका आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिला.

























































