दीड लाख विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ आणि मसाई स्कूल यांनी देशातील तरुणांना तांत्रिक कामात निपुण करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीतून कौशल्य प्रशिक्षण राबवण्यात येईल. या भागीदारी करारावर एनएसडीसीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आणि ऑफिसिएटिंग सीईओ वेद मणी तिवारी आणि मसाई स्कूलचे सहसंस्थापक आणि सीईओ प्रतीक शुक्ला यांनी स्वाक्षऱ्या केल्या. स्किल इंडिया मिशनला चालना देत या सहकार्याच्या माध्यमातून पुढील सात वर्षांच्या कार्यकाळात द्वितीय आणि तृतीय श्रेणी शहरांमधील दीड लाखाहून अधिक विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळणार आहेत. कमी उत्पन्न गटातील कुटुंबांपुढे बँकेकडून कर्ज मिळवणे ही कौशल्य प्रशिक्षणातील एक साधारणपणे जाणवणारी अडचण असते. म्हणूनच या दोन संस्थांतर्फे बँक कर्ज प्रणालीला पर्याय देण्यासाठीही प्रयत्न केले जातील. मसाईतर्फे 10 कोटी रुपये मुल्याची शिष्यवृत्तीही देण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 250 विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.