
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छत्तीसगढ दौऱ्याच्यावेळी नॅशनल स्टुडण्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया व काँग्रेसने मोदींचा कडाडून विरोध केला असून अनेक रस्त्या रस्त्यांवर ‘गो बॅक मोदी’ लिहले आहे. तसेच छत्तीसगढमधील शेतकऱ्यांनी देखील मोदींचा विरोध करण्यासाठी आजचा दिवस काळा दिवस म्हणून घोषित केला असून गावागावात शेतकऱ्यांकडून काळे झेंडे फडकविण्यात आले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज छत्तीसगढच्या दौऱ्यावर आले असून तेथे ते रायपूर, दुर्ग और भिलाई या भागांना भेट देणार आहेत. मात्र नरेंद्र मोदी यांनी राज्यातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी, बेरोजगारी व गुन्हे कमी करण्यासाठी काहीही पाऊले उचललेली नाही, असा आरोप करत नॅशनल स्टुंडण्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया व काँग्रेसने मोदींविरोधात आंदोलने करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर नॅशनल स्टुडण्ट्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्या रस्त्यांवर ‘गो बॅक मोदी’ लिहून ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
छत्तीसगढमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी न मिळाल्याने प्रगतिशील किसान संघटनेने मोदींच्या दौऱ्याच्या दिवशी काळा दिवस पाळण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक गावांमध्ये मोदींचा विरोध करण्यासाठी काळे झेंडे फडकवले आहेत.

























































