‘एनविडीया’ बनली जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी

सेमीकंडक्टर चिप बनवणाऱ्या ‘एनविडीया’ कंपनीच्या शेअर्सने बुधवारी जबरदस्त उसळी घेतली. कंपनीच्या शेअर्समध्ये 4 टक्क्यांहून अधिक तेजी आली आणि कंपनीची मार्केट वॅल्यू 3.763 ट्रिलियन डॉलर एवढी झाली. त्यामुळे एनविडीया जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी बनली आहे. 3.658 ट्रिलियन डॉलर बाजारमूल्यासह मायक्रोसॉफ्ट जगातील दुसऱ्या क्रमांकाची व्हॅल्युएबल कंपनी ठरली आहे. ‘एनविडीया’चे शेअर बुधवारी 154.10 डॉलरच्या नव्या रेकॉर्डवर पोहोचले. जगातील सर्वात व्हॅल्युएबल कंपनी बनण्यासाठी एनविडीया, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल या सारख्या कंपन्या सतत एकमेकांना जोरदार टक्कर देत आहेत.