Video – चंद्रपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त

चंद्रपुरात आयोजित ओबीसी मोर्चाला सुरुवात झाली आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या प्रमुख मागणीसाठी मोर्चा आयोजित करण्यात आलाय. दीक्षाभूमी मैदानातून शहराचे भ्रमण करत बाह्य भागात मोर्चाचा समारोप होणार आहे.

मराठ्यांचे आरक्षण ओबीसी कोट्यातून दिले जाऊ नये, असा इशारा सरकारला देण्यासाठी मोर्चा महत्वाचा ठरणार आहे. मोर्चात जिल्हाभरातून महिला-पुरुषांची मोठी उपस्थिती आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, आयोजक कोरोना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देत आहेत.

ओबीसी समूहाची नव्यानं जनगणना करावी, ओबीसी जात घटकांतील नागरिकांच्या नोकरी- शिक्षणाच्या आरक्षण संदर्भातील अन्याय दूर करण्याची मागणी या मोर्चाच्या निमित्ताने केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या