मराठा आंदोलनाला हजेरी, ओबीसींच्या आंदोलनाकडे पाठ; अतुल सावेंच्या राजीनाम्याची मागणी

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथे मराठा समाजाने आंदोलन केले. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले मात्र आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन संपलेले नाही. या आंदोलनाला ओबीसी विभागाचे मंत्री अतुल सावे यांनीही हजेरी लावली होती. यावरून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने टीका केली आहे. सावे यांना मराठा समाजाच्या आंदोलनासाठी वेळ आहे मात्र ओबीसी करत असलेल्या आंदोलनाची साधी दखलही घ्यायला त्यांना वेळ नाही का ? असा सवाल महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी केला आहे. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये कारण ते सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, तसेच सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले आहे असा दावा राजुरकर यांनी केला आहे.