
केंद्र सरकारचा रोष ओढवून घेणाऱ्या ट्विटरच्या अडचणींत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील वादग्रस्त मजकूर हटवण्याच्या न्यायालयीन आदेशाला न जुमानणाऱ्या ट्विटरला आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिला आहे. हिंदुस्थानातील कायदे पाळा, नाहीतर आपला बाडबिस्तरा गुंडाळून देशाबाहेर चालते व्हा, असा सज्जड दम न्यायालयाने ट्विटरला दिला.


























































