दोषींना सोडणार नाही; कठोर कारवाई करू – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बालासोर येथे जाऊन रेल्वे अपघातस्थळाची पाहणी केली आणि बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांची विचारपूस केली.

यावेळी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, दुःख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. या अपघाताची सखोलपणे आणि जलदगतीने चौकशी केली जाईल. दोषींना सरकार सोडणार नाही. कठोर कारवाई केली जाईल. हा अपघात देशासाठी धडा असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकार निश्चित पावले उचलेल. मृत कुटुंबीयांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून जखमींची पूर्ण काळजी घेतली जाईल. बचावकार्यात ओडिशा सरकार आणि स्थानिक जनतेने केलेल्या कामाचे पंतप्रधानांनी कौतुक केले. तसेच रक्तदानासाठी मोठय़ा प्रमाणावर जनता समोर आली याबाबत समाधान व्यक्त केले.