
सामना प्रतिनिधी । मुंबई
मरोळ अंधेरी येथील राहत्या इमारतीत शिरलेल्या बिबट्यामुळे रहिवाशांची घबराट उडाली. तब्बल तीन तासांच्या थरारानंतर वन विभागाने या बिबट्याला जेरबंद केले. मात्र इमारतीच्या जिन्याखाली दबा धरून बसलेल्या बिबटय़ाला जेरबंद करताना वन विभागाची तारांबळ उडाली.
मरोळ पोलीस कसाहतीजकळच्या कुड लँड इमारतीत सकाळी 9 वाजताच्या सुमारास हा बिबटय़ा शिरला. माणसांची चाहूल लागताच त्याने जिन्याखाली दबा धरला. सकाळी 9.30 काजताच्या सुमारास कन किभागाच्या टीमने घटनास्थळी धाक घेतली. यावेळी परिसरात बघ्यांची गर्दीही जमा झाली. त्यामुळे वन विभागाला काम करणे कठीण बनले होते. मात्र पोलिसांनी गर्दीला हटकून परिसर मोकळा केला. बिबटय़ाने याकेळी आठ मजली लँड सोसायटीतील इमारतीच्या तळमजल्याच्या जिन्याखाली दबा धरून बसला. यावेळी बोरिकली नॅशनल पार्क, ठाणे येथील रेस्क्यू टीमने बिबटय़ाला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. बिबटय़ा इमारतीत शिरण्याचा धोका असल्यामुळे वन अधिकाऱयांची धावपळ उडाली. मात्र इमारतीला एकच प्रकेशद्वार असल्याने आत प्रवेश करणार असाही प्रश्न होता. शेवटी इमारतीच्या घराला असलेली ग्रील तोडून कनाधिकारी इमारतीत शिरले. लिफ्टचा कापर करून थेट आठक्या मजल्याकरून रेस्क्यू टीम तळमजल्यापर्यंत पोहचली. याठिकाणी जिन्याखाली सिमेंटच्या गोण्यांमागे लपलेल्या बिबटय़ाला सुरक्षित पकडण्यासाठी काम सुरू केले. यावेळी बिबटय़ाला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले आणि तब्बल तीन तासांच्या थरारानंतर बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले.
शिकारीसाठीच आल्याचा अंदाज
नॅशनल पार्कमधील बिबटय़ांसाठी जवळच्या मानवी वस्तीमधील भटकी कुत्री सहज उपलब्ध होणारे अन्न आहे. त्यामुळे हा बिबटय़ा शिकारीच्या उद्देशानेच आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हा बिबटय़ा सुमारे दोन वर्षे वयाचा नर आहे. दरम्यान, बिबटय़ाला जेरबंद केल्यानंतर संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आरोग्य तपासणीसाठी पाठकण्यात आले असून तिथे त्याच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. तपासणीत तो फिट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तपासणीत जंगलात सोडून देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती संजय गांधी नॅशनल पार्कचे पशुकैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांनी दिली.





























































