स्वातंत्र्यदिनी येणार ओलाची इलेक्ट्रिक कार 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता करणारी ओला इलेक्ट्रिक पंपनी  स्वातंत्र्यदिनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची शक्यता आहे. त्याबाबतची माहिती ओला इलेक्ट्रिकचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी ट्विट करून दिली आहे. अग्रवाल ट्विटमध्ये म्हणाले की, ओला पंपनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवीन उत्पादनाची घोषणा करणार आहे. हे पाहता या स्वातंत्र्यदिनी पंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार आणू शकते असे एपंदरीत दिसून येत आहे. अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये जास्त खुलासा केला नाही, परंतु ओलाने आधीच इलेक्ट्रिक कारमध्ये स्वारस्य दाखवले आहे. सीईओ अग्रवाल यांनीही काही महिन्यांपूर्वी याबाबत ट्विट केले होते.