
सायबर चोरट्यांनी ओला इलेक्ट्रिक स्कुटर बुक करण्याच्या नावाखाली अनेकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. आरोपी देशातील वेगवेगळ्या राज्यात बसून ओला इलेक्ट्रीक स्कूटर विकण्याच्या नावाखाली फसवणूक करत होते. याप्रकरणी 20 आरोपींना अटक केली आहे.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फसवणूक करणाऱ्या या टोळीने कमीत कमी हजारो लोकांची फसवणूक केली आहे. बंगळुरुत राहून दोन आरोपींनी ओलाचे एक फेक संकेतस्थळ तयार केले. ज्यामुळे संकेतस्थळावर व्हिजीट करणाऱ्या लोकांना आरोपी त्यांच्या जाळ्यात ओढत होते. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसे ग्राहक ओला ई स्कूटीबाबत माहिती घेण्यासाठी गुगल सर्च करायचे. तेव्हा त्यांना हेच संकेत दिसायचे. त्यानंतर टोळक्यातले सगळे आरोपी ओला इलेक्ट्रिक स्कूटर विकण्याच्या नावाखाली पैसे जमा करायला सांगायचे.
मीडिया वृत्तानुसार, ओलाने दिवाळीच्या दिवशी एक इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 Air लॉन्च केली होती. या स्कूटरसाठी अनेकांनी ऑनलाईन बुकींग केली होती. ग्राहक जसे या फेक संकेतस्थळाला भेट देऊ आपली माहिती त्यात भरायचे. त्याच्या काही वेळात बंगळुरुत बसलेल्या दोन आरोपी ग्राहकांचा तपशील आणि मोबाईल नंबर दुसऱ्या राज्यात असलेल्या आरोपी साथिदारांना कळवायचे. त्यानंतर ग्राहकांना फोन करुन ओला स्कूटर बुक करण्यासाठी 499 रुपये बुकिंग रक्कम पाठवायला सांगितले जायचे. त्यानंतर आरोपी स्कूटरचे इंशुरन्स, टॅक्स आणि ट्रान्सपोर्टेशन चार्जेस च्या नावाखाली एका ग्राहकाकडून 50 ते 70 हजार वसूल करायचे. अशा पद्धतीने या टोळक्याने कमीत कमी 1 हजार लोकांना आपल्या जाळ्यात ओढले आणि जवळपास 5 कोटी रुपयांची फसवणूक केली. सध्या दिल्ली पोलिसांनी ओला इलेक्ट्रिक स्कूटर स्कॅम करण्याच्या आरोपाखाली 20 आरोपींना अचक केली असून पुढील तपास सुरु आहे,

























































