81 वर्षांच्या आजीबाई पडल्या 40 वर्षाच्या व्यक्तीच्या प्रेमात, मुलींची पोलिसांत धाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीच्या पोलीस ठाण्यामध्ये दोन महिला आल्या होत्या. या महिलांसोबत त्यांचे 84 वर्षांचे वडीलही होते. या तिघांनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे एक अर्ज दिला. समोर बसलेली वृद्घ व्यक्ती आणि त्यांच्या मुली हे सुखवस्तू कुटुंबातील असावेत असे दिसत होते. वृद्ध व्यक्ती ही रेल्वेमध्ये मोठ्या पदावर कामाला होते आणि ते तिथून निवृत्त झालेली होती. त्यांच्या मुलींनी पोलिसांना एक अर्ज दिला, ज्यात म्हटले होते की त्यांची 81 वर्षांची आई ही त्यांच्यापेक्षा जवळपास 40 वर्ष लहान माणसाच्या प्रेमात पडली आहे.

पोलीस ठाण्यात वडिलांसोबत आलेल्या महिलांपैकी एकीचे वय अंदाजे 55 वर्षे होते तर दुसरीचे वय अंदाजे 50 वर्षे इतके होते. या दोघींनी पोलिसांना दिलेल्या अर्जात त्यांच्या आईबद्दलच्या तक्रारी लिहिल्या होत्या. त्यांनी म्हटले होते की त्यांची आई ही त्यांच्या प्रियकराला कधीही भेटायला जाते. मोबाईलवरून त्याच्याशी सतत बोलत असते. आपली आई वडिलांकडे लक्ष देत नसून तिच्या प्रियकराला घरी देखील बोलावते. यावर पोलीस अधिकाऱ्यांना बाहेर बसलेल्या त्यांच्या आईला आतमध्ये बोलावले आणि त्या महिलेला विचारले की मुली सांगतात,ते बरोबर आहे का? त्यावर त्या आजीने सांगितले, ‘हो बरोबर आहे, आणि मी माझे मर्जीने करते’

कोरा (quora) या प्रश्न उत्तरांच्या एका संकेतस्थळावर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी हा प्रकार सांगितला आहे. 5 जुलै रोजी त्यांनी हे उत्तर दिले असून ही घटना उत्तर दिल्याच्या साधारणपणे 9 महिने आधी घडली होती असं त्यांनी म्हटलं आहे. कायदा रक्षक म्हणून काम करताना एखादी हास्यास्पद तक्रार केल्याचा काही अनुभव सांगाल का? या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी उत्तरादाखल ही घटना सांगितली आहे.

कायदा रक्षक म्हणून काम करताना एखादी हास्यास्पद तक्रार एखाद्याने केल्याचा काही अनुभव सांगाल का?

बाळासाहेब पवार (Balasaheb Pawar) चे उत्तर: जितू सर छान प्रश्न विचारला आपण,, कायदा रक्षक म्हणून नोकरीच्या काळात खूप हास्यास्पद तक्रारी चा अनुभव आला, येतो आहे,, फक्त हास्यास्पद कशी ठरवायची,, हे ठरविणे अवघड होते,, कारण त्या वेळेस फक्त आमचे कडे स्मित हास्य असते,, डोंबिवली मध्ये कर्तव्यावर असताना सुम…