ऑलिम्पिकच्या तयारीसाठी महिला धावपटू द्युती चंद कार विकणार

406

कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिक आता पुढल्या वर्षी ढकलण्यात आले आहे. यामुळे खेळाडूंना सरावासाठी आणखी अवधी मिळालाय. पण ऑलिम्पिकच्या तयारीसाठी सरकार आणि स्पॉन्सर्सकडून मिळालेली आर्थिक मदत लॉकडाऊनमध्ये संपल्यामुळे काही खेळाडूंवर आर्थिक संकट कोसळले आहे. हिंदुस्थानची वेगवान महिला धावपटू द्युती चंद हिलाही याच संकटामधून जावे लागत आहे. यावेळी ती म्हणाली, मला ऑलिम्पिकच्या ट्रेनिंगसाठी पैशांची गरज आहे. कोरोनामुळे स्पॉन्सर्स मिळणे मुश्किल होऊन बसले आहे. यामुळेच मी कार विकण्याचा निर्णय घेतला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या