ऑलिम्पिकमध्ये कबड्डीचा समावेश?

251

ऑलिम्पिक या जागतिक स्तरावरील मानाच्या क्रीडा महोत्सवात कबड्डी या महाराष्ट्राच्या मातीतल्या खेळाचा समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू याप्रसंगी म्हणाले की, 2024च्या ऑलिम्पिकमध्ये कबड्डी या खेळाचा समावेश होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. असे झाल्यास ऑलिम्पिकमध्ये कबड्डी… कबड्डीचा दम घुमणार हे निश्चित. आपल्या देशातील खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवून द्यायचे असे मला वाटते. क्रीडामंत्री असल्यामुळे हे मी माझे कर्तव्य समजतो. कबड्डी हा आपल्या देशातील प्रसिद्ध खेळ असून आशियाई स्पर्धेतही याचा समावेश आहे. त्यामुळे ऑलिम्पिकमध्ये हा खेळ खेळला जावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे ते पुढे विश्वासाने म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या