
ओमायक्रोन हा कोरोनाचाच व्हेरिएंट आहे हे आजपर्यंत मानले जात होते. मात्र कोरोना आणि ओमायक्रोन या दोन स्वतंत्र महामारी आहेत, असे विषाणू वैज्ञानिक डॉ. टी. जेकब जॉन यांचे म्हणणे आहे. कोरोनाच्या वुहान-डी 614 जी, अल्फा, बिटा, गॅमा, डेल्टा, कप्पा, म्यू या व्हेरिएंटमधून ओमायक्रोनची निर्मिती झाली नसल्याचा दावा डॉ. जेकब यांनी केला आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात बोलताना डॉ. जेकब म्हणाले, ओमायक्रोनमुळेच ही तिसरी लाट आली असून शेवटी ओमायक्रोन ही एक स्वतंत्र महामारी आहे.



























































