
सुप्रिया प्रॉडक्शनतर्फे घेण्यात येणाऱया बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी 19 व 20 डिसेंबर रोजी मुंबईत आणि 27 डिसेंबर रोजी नागपूर अशा दोन पेंद्रांवर होणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी येत्या 12 जानेवारी रोजी मुंबईत होईल. स्पर्धेसाठी प्रथम तीन सांघिक विजेत्यांना रुपये 21 हजार, 15 हजार व 10 हजार अशी पारितोषिके देण्यात येतील. याशिवाय लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, पार्श्वसंगीत, रंगभूषा, वेशभूषा, विनोदी लेखन, विनोदी अभिनय, उत्तम व्यवस्थापन अशी विविध पारितोषिके नाटय़क्षेत्रातील दिग्गजांच्या स्मरणार्थ देण्यात येणार आहेत. यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष आहे. आतापर्यंत स्पर्धेत 400 हून अधिक संघ सहभागी झाले आहेत. बोलीभाषा एकांकिका स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क 99304 66924


























































